तीन वैदर्भीय : सर्जनशील ज्ञानानुबंध
सांस्कृतिक संदर्भ ही राजकीय आणि सामाजिक इतिहासाची सामग्री असते. सांस्कृतिक संदर्भ खऱ्या स्वरूपात तेव्हाच्या तेव्हा कागदावर उतरला तर तो इतिहासाचा मौलिक साक्षीदार होतो. पण पुराव्याअभावी सांस्कृतिक संदर्भ लोकमानसात जर मौखिकरूपाने वर्षानुवर्षे टिकून राहिला तर लोकप्रतिभेने त्याची आख्यायिका होते. मग ती इतिहासाचा पुरावा असत नाही. विदर्भातील लोकनायक बापूजी अणे, थोर संशोधक डॉ.य.खु.देशपांडे आणि प्राचार्य राम शेवाळकर …